भारत सरकार | महाराष्ट्र शासन | रत्नागिरी जिल्हा |तालुका खेड

ग्रामपंचायतीबद्दल माहिती

हेदली ग्रामपंचायतीची स्थापना १९५९ रोजी करण्यात आलेली आहे. हेदली गावामध्ये एकूण आठ वाड्या आहेत. बाजारवाडी, बौद्धवाडी, चिनकटेवाडी, गायकवाडवाडी, मधलीवाडी, म्हादेवाडी, काणेकर मोहल्ला, धुलपवाडी अश्या वाड्या आहेत. या गावामध्ये सर्व धर्माचे लोक राहतात. गावामध्ये अनेक प्रकारची देवस्थाने असून सर्व जाती धर्माचे लोक एकत्रीतपणे येवून परंपरागत सन साजरे करतात. आणि हेदली हे गाव खेड शहरापासून ९ कि. मी.अंतरावर आहे.  गावात गणेशोउत्सव, दिवाळी, दसरा ई. सण साजरे केले जातात.